पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – दिघी-आळंदी रोडवर सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना अश्लिल हावभाव करून अडथळा निर्माण करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस हवालदार उदयकुमार भोसले यांनी गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिला आरोपीच्या विरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी रोडवरील फुटपाथवर ही महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना थांबवून अश्लील हावभाव करत होती. या कृत्यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. दिघी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दिघीमध्ये अश्लिल हावभाव करणा करणाऱ्या महिलेवर गुन्हा
