चिखलीत सायबर फसवणूक; आयडीएफसी खात्यावरून ५.७७ लाखांचा व्यवहार
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – खासगी बँकेच्या खात्याचा वापर करून ५ लाखांपेक्षा जास्त रकमेची सायबर फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे घडली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आकाश नायकोजी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आदित्य अशोक पाटणकर (जाधववाडी, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आयडीएफसी फर्स्ट बँकेचे खाते उघडून टोळीचा सदस्य म्हणून ५ लाख ७७ हजार ६८५ रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार केले. या खात्याद्वारे भारतातील दोन नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.