Delhi-संसद मार्चदरम्यान हिंसाचार; ६ IPS अधिकाऱ्यांसह ११८ पोलिस जखमी, ६० आंदोलकही जखमी.

नवी दिल्ली :

दिल्लीतील संसद मार्च आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमध्ये ६ IPS अधिकाऱ्यांसह ११८ पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे ६० आंदोलकांनाही दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

या गोंधळादरम्यान पोलिसांच्या २० हून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे.

घटनेनंतर संसद भवनाकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *