Delhi-धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला असून, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. या निर्णयानंतर देशातील शिक्षण क्षेत्रात नव्या नेतृत्वाची औपचारिक सुरुवात झाली आहे.
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राजकीय घडामोडींनंतर हा निर्णय घेण्यात आला. आता शिक्षण मंत्रालयाची धुरा प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष त्यांच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे.
शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व, परीक्षा प्रक्रियेतील विश्वासार्हता आणि विद्यार्थीहिताला प्राधान्य देणाऱ्या ठोस सुधारणांची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे. नव्या नेतृत्वाखाली पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आणि परीक्षा व्यवस्थेत व्यापक बदल होतील का हा सध्या प्रश्नाचा आहे