Mumbai-हिंदुस्तानी भाऊंचा मोठा दावा; ‘ठाकरेंचे आमदार-नगरसेवकही फुटणार’, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्तानी भाऊ यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी ठराविक तारीख सांगत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदार आणि नगरसेवकही फुटणार असल्याचा दावा केला आहे.

हिंदुस्तानी भाऊ यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.

याच व्हिडिओमध्ये त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत, “भांडूपचा अनिल कपूर” असा टोला लगावला आहे.

हिंदुस्तानी भाऊ यांनी केलेल्या या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत पुरावा किंवा संबंधित पक्षांकडून दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या दाव्यांकडे राजकीय चर्चेच्या आणि वैयक्तिक विधानांच्या स्वरूपातच पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *