भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा; शंभू सीमा सील, राजधानीत कडक सुरक्षा
हरियाणा
भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात शेतकरी संघटनांनी आज दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हरियाणा-पंजाबमधील शंभू सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था लागू करत सीमा पूर्णपणे सील केली आहे.
शंभू बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, अनेक स्तरांवर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. आंदोलकांना दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
दरम्यान, दिल्लीतील किसान घाट परिसरातही शेतकरी आंदोलनाची तयारी सुरू असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. राजधानीतील संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.