Mumbai-मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘डेल्टा ॲक्ट’च्या मसुद्यावर महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे ‘द महाराष्ट्र डिजिटायझेशन अँड एक्स्चेंज ऑफ लँड टोकन ॲसेट ॲक्ट (DELTA Act)’ या महत्त्वाकांक्षी कायद्याच्या मसुद्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली.
बैठकीत राज्यातील जमीन नोंदींचे डिजिटायझेशन, जमिनीशी संबंधित व्यवहारांमध्ये पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच भविष्यातील डिजिटल जमीन व्यवस्थापनासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील जमीन व्यवस्थापन अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने हा कायदा महत्त्वाचा ठरणार असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.