Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

Kolhapur-कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरासाठी सुमारे १,५०० कोटींचा विकास आराखडा; अमित शाह यांचे गौरवोद्गार

By Sumedh Chapalgaonkar
June 20, 2026 2 Min Read
0

कोल्हापूर(kolhapur) : दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराचा सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या निधीतून भव्य कॉरिडॉर आणि विकास प्रकल्प म्हणून विकास केला जाणार असून, ही कोल्हापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

कोल्हापूर येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात बोलताना अमित शाह यांनी श्री अंबाबाई मंदिराचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. देशातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या मंदिराचा विकास झाल्यानंतर देश-विदेशातील भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती नव्याने बळकट होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी सातत्याने आग्रह धरला होता. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा तीर्थक्षेत्राच्या विकासाची कामेही वेगाने सुरू आहेत. या व्यापक विकास आराखड्यामुळे पुढील शंभर वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन भाविकांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव करत श्री अंबाबाई मंदिर परिसरातील आधुनिकीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला आजपासून प्रारंभ झाल्याचे सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर आणखी उंचीवर पोहोचेल आणि शहराच्या विकासालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसराचे संवर्धन, सुशोभीकरण, भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा, प्रदक्षिणा मार्गाचा विकास, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग, सांस्कृतिक केंद्रे आणि पर्यटनवाढीसाठी विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags:

Development plan worth approximately 1500 crore for Kolhapurs Shri Ambabai Temple Amit Shah lauds the initiative.
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Mumbai-शिवसेनेच्या वर्धापन दिनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; सुषमा अंधारेंचे नागेश पाटील आष्टीकरांना खुले आव्हान

Next

Delhi-‘टीबी मुक्त भारत’ अभियानाला वेग; २८ कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचा आढावा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme