काँगोच्या पूर्वेकडील इटूरी प्रांतात इबोला मुळे आत्तापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला असून 246 जणांना लागण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले असले तरी त्यांच्या म्हणण्यानुसार हा रोग साथीच्या रोगाच्या श्रेणीत येत नाही .हा रोग सध्या इटूरी प्रांतातील बुनिया,रवामपारा,आणि मोंगवालू या भागांपर्यंत पोचला आहे, काँगोमधे 1976 साली पहिल्यांदा इबोला चां विषाणू समोर आला होता, तद्न्यांच्या मते यावेळी इबोलाचा बुंडीबुग्यो स्ट्रेन आढळला असून यापूर्वी इबोलाचा झैरे स्ट्रेन आढळल्याने त्यावरील उपचार आणि लसी बनविण्यात आल्यामुळे नवीन स्ट्रेन हा चिंतेचा विषय झाला आहे . इटूरी प्रांताची राजधानी बुनिया येथे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून , शेजारील देशांमध्ये हि त्याचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, 2014 ते 2016 दरम्यान इबोलाचा इतिहासातील सर्वात मोठा उद्रेक होता या काळात 11 हजारांहून अधिक मृत्यू झाल्याने , वाढता धोका लक्षात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन WHO कडून करण्यात आले आहे
काँगो मध्ये इबोला विषाणूचा उद्रेक,80 जणांचा मृत्यू तर 246 जणांना लागण झाल्याचा संशय WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित
