नसरापूर अत्याचार प्रकरणात ११०० पानी आरोपपत्र; पंधरा दिवसांत पोलिसांची कारवाई

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसांत ११०० पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे. आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याच्याविरुद्ध पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले आहेत.

आरोपपत्रात ५० हून अधिक साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए चाचणी, वैद्यकीय तसेच न्यायवैद्यकीय अहवालांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनही केले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून खटला चालविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने अहोरात्र तपास करत आरोपपत्र दाखल केले. या वेळी विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि तपास अधिकारी विजयमाला पवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *