pune-‘एक होतं माळीण’चा टीझर उद्या प्रदर्शित; माळीण दुर्घटनेची हृदयद्रावक कहाणी मोठ्या पडद्यावर

पुणे(pune) : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या माळीण भूस्खलन दुर्घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ या मराठी चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार आहे. मानवी वेदना, निसर्गाचा रौद्र अवतार आणि जगण्यासाठीचा संघर्ष यांची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

“ज्या मातीने पिढ्यानपिढ्या गावाला घास दिला, त्याच मातीने एका पहाटे संपूर्ण पिढीचा श्वास का घेतला?” या प्रभावी प्रश्नासह चित्रपटाची उत्सुकता वाढविण्यात आली आहे. एका काळरात्रीत उद्ध्वस्त झालेल्या गावाची आणि मानवी हतबलतेची जिवंत कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

‘एक होतं माळीण – द लँडस्लाइड’ हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, टीझरनंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *