आधार कार्ड मागण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला मारहाण

पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – स्वतःची कागदपत्रे परत मागण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेला नातवाने मारहाण केली. याबाबत जाब विचारण्‍यासाठी गेलेल्‍या काका आणि काकीलाही मारहाण करीत जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास रहाटणी येथील पवनानगर परिसरात घडली.
या प्रकरणात शंकर शिवराम नखाते (वय ५२, रा. कृष्णाई कॉलनी, रहाटणी) यांनी मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस संतोष नखाते (वय २४, रा. पवनानगर, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई यमुनाबाई नखाते या पुतण्या तेजस याच्याकडे स्वतःचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड मागण्यासाठी गेल्या होत्या. मात्र कागदपत्रे देण्यास नकार देऊन तेजसने त्यांना ढकलून दिले. याबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची पत्नी गेले असता, आरोपी पुतण्‍याने त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *