सुगंधी पान मसाला विकणाऱ्या तरुणाला अटक

पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – शासकीय बंदी असतानाही चोरून प्रतिबंधित पान मसाल्याची विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकावर अन्न सुरक्षा विभागाने गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वाकड येथील काळाखडक रोडवरील रामा पान शॉपमध्ये करण्‍यात आली.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शितल घाटोळ यांनी मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. रणजित राजू चौरसिया (वय २६,रा. युरो शाळेजवळ, वाकड, पुणे) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अन्न सुरक्षा विभागाचे पथक गस्त घालत असताना काळाखडक येथे एका टपरी मध्ये प्रतिबंधित असलेला केसरयुक्त विमल पान मसाला आरोपी विकताना मिळून आला. त्याच्याकडून एकूण पाच हजार ९५५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी टपरी चालकाला अटक केली आहे. वाकड पोलीस याबाबत .िअधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *