लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडत वनडे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित ५० षटकांत अवघ्या ३ विकेट्स गमावत तब्बल ३८७ धावा उभारल्या.
या दमदार कामगिरीसह इंग्लंडने लॉर्ड्स मैदानावरील वनडे क्रिकेटमधील ५१ वर्षांपूर्वीचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. भारतीय गोलंदाजांवर आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली आणि भारतासमोर विजयासाठी ३८८ धावांचे मोठे आव्हान उभे केले.
