Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad-मतदार यादी पुनरीक्षणाला मुदतवाढ; ८ ऑगस्टपर्यंत बीएलओंच्या घरपोच भेटी सुरूच अतिवृष्टीमुळे निवडणूक आयोगाचा निर्णय; गणना प्रपत्र भरून सहकार्य करण्याचे पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन

By Sumedh Chapalgaonkar
July 20, 2026 1 Min Read
0

पिंपरी :
मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. राज्यातील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, आता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरिकांच्या घरभेटी घेऊन गणना प्रपत्र संकलित करणार आहेत.

सुधारित वेळापत्रकानुसार ८ ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचनेचे कामही पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार असून, त्यावरील सुनावणी व निपटारा करून १९ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पात्र मतदारांनी बीएलओंना आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र भरून द्यावे किंवा संबंधित मतदान केंद्रावर जाऊन ते सादर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “मतदार यादी हा लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव अचूकपणे नोंदविले जाणे आवश्यक आहे. मुदतवाढीचा लाभ घेत नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”

अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनीही नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता गणना प्रपत्र तातडीने भरून देण्याचे आवाहन केले आहे.

सुधारित वेळापत्रक

८ ऑगस्टपर्यंत – बीएलओंच्या घरभेटी व गणना प्रपत्र संकलन

८ ऑगस्ट – मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण पूर्ण

१७ ऑगस्ट – प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

१७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर – दावे व हरकती स्वीकारणे

१९ ऑक्टोबर – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Pimpri-Chinchwad-मोशीतील विषारी धुरावर महापौरांचा बडगा प्लास्टिक-टायर जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश

Next

Delhi-पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल मिश्रणाचा निर्णय अद्याप नाही; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme