अनिल मोरे खून प्रकरण: ४ जणांना अटक मुख्य सूत्रधार मात्र अद्यापही फरार

​पिंपरी-चिंचवड :
मोशी टोलनाक्याजवळील हॉटेल युवराज गार्डन येथे झालेल्या अनिल मारुती मोरे उर्फ मोरे यांच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात एमआयडीसी भोसरी पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या खुनाचा मुख्य सूत्रधार मात्र अजूनही फरार आहे.

असे घडले होते हत्याकांड
​१३ मे २०२६ रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी अनिल मोरे यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची निघृण हत्या केली होती. याप्रकरणी नागनाथ कुंडलिक चाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​तांत्रिक विश्लेषणाने आवळल्या मुसक्या
​पोलिसांच्‍या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून १५ मे चार जणांना अटक केली. यामध्‍ये नागेश लक्ष्मण काळे (वय २९), अजय सर्जेराव गायकवाड (वय २०), अजय सिकंदर आव्हाड (वय २७, तिघेही रा. शांतीनगर वसाहत, भोसरी) आणि दत्ता चत्रभुज शिनगारे (वय ३०, रा. आंबेडकर वसाहत, लांडेवाडी, भोसरी) यांचा अटक आरोपींमध्‍ये समावेश आहे.
​न्यायालयाने या चारही आरोपींना २५ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

!

या टीमने केली कामगिरी
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, उपायुक्त मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार, भोजराज मिसाळ, उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले यांच्या तपास पथकाने ही धडक कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *