July 23, 2026

भुकूममध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी हरणाचा मृत्यू; वनविभागाकडून तपास सुरू.

0
WhatsApp Image 2026-05-30 at 3.40.29 PM

मुळशी तालुक्यातील भुकूम येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी हरणाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली.

शिवराय ढाब्यासमोर भरधाव वाहनाने हरणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, एनडीएलगतच्या जंगलातून पाणी पिण्यासाठी आलेले हे हरीण रस्ता चुकून मुख्य कोलाड महामार्गावर आले असावे. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू केली असून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed