पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात महिला ठार झाली असून तिचे वडिल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मोशी येथील इंडियन ऑईल काजळे पेट्रोल पंपाजवळ बुधवारी (दि. १० जून) रोजी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास घडली.
सविता दयानंद कांबळे (वय ३०, रा. आदर्शनगर, मोशी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर तिचे भाऊ पांडुरंग एकनाथ कुचेकर (वय ३५, रा. सेक्टर १२, भोसरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंटेनर चालक सुंदर पंढरीनाथ गवळी (वय २६, रा. दिघी, मूळ बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर फिर्यादी यांचे वडिलही गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिणी वडिलांसोबत आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून (MH14 FB 9112) घेऊन आदर्शनगर येथील घरी जात होते. दरम्यान, पेट्रोल पंपाजवळ आले असता कंटेनर चालकाने आपले वाहन हयगईने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांच्या वडिलांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून बहीण सविता हिचा मृत्यू झाला.
कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
