पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – एका तरुणाला गाठून लाथाबुक्यांनी मारहाण करत जबरदस्तीने मोबाइल आणि रोकड चोरून नेली. ही घटना पिंपरी रेल्वे स्टेशन जवळील भारतनगर सार्वजनिक शौचालयापाशी मंगळवारी (दि. ९ जून) रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.
तोहीद मुन्ना शेख (वय २२, रा. तथागत हौसिंग सोसायटी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. यश चंद कांबळे (वय २०, रा. भारत नगर, पिंपरी) याला अटक केली असून त्याचे साथीदार सुदर्शन थोरात आणि शिव पवार (दोघे रा. भारत नगर, पिंपरी) यांच्याविरुद्ध बुधवारी (दि. १० जून) रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तोहीद हे पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरातून जात असताना आरोपींनी त्यांना ‘काम आहे’ असे म्हणून थांबवले व पैशांची मागणी केली. तोहीद यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि ७०० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली.
तरुणाला मारहाण करून मोबाइल, रोकड लांबवली
