चाकण परिसरात १२ लाखांचा गांजा जप्त; तिघांना अटक

पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – बेकायदेशीररीत्या गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २७ मे) रोजी दुपारी ३:२५ वाजेच्या सुमारास हॉटेल वैष्णवीसमोर, शिक्रापूर-चाकण हायवे रोड, मोहितेवाडी येथे करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई निखिल वर्पे यांनी गुरुवारी (दि. २८ मे) रोजी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संदीप भगवान हांडे (वय २८, रा. खराबवाडी, मूळ – छत्रपती संभाजीनगर), गणेश सुरेश तारू (वय ३०, रा. खराबवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. आंबेगाव) आणि रिहान वसीम शेख (वय १९, रा. खंडोबामाळ, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून विक्रीसाठी २३ किलो ५३८ ग्रॅम वजनाचा गांजा बाळगला होता. जप्त केलेल्या गांजाची किंमत १२ लाख १० हजार ५०० रुपये आहे. पोलिसांनी गांजासह तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकण दक्षिण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *