तरुणाच्या बँक खात्यावरून 30 लाखांचे आर्थिक गैरव्यवहार
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – निगडी परिसरामध्ये बँक खात्याद्वारे 30 लाखांहून अधिक रकमेचे संशयास्पद आर्थिक व्यवहार करण्यात आले. ही घटना 14 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान घडली.
पोलीस शिपाई सुमित मारुती मोरे (वय 24) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. वेदांत अनिल कुदळे (वय 20, रा. कुदळे चाळ, आकुर्डी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते उघडून आपल्या साथीदारांच्या मदतीने 30 लाख दोन हजार 742 रुपयांचे व्यवहार केले. या माध्यमातून देशभरातील दोन नागरिकांची दोन लाख26 हजार 249 रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.