पिंपरी, दि. ३१ (pimpri chinchwad) – वाहन विक्री करारातील अटींचे उल्लंघन करून श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते न भरता एकाने वाहनाचा परस्पर गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १ नोव्हेंबर २०२४ रोजी भोसरी येथे घडली.
मुदस्सिर मोहम्मद इसहाक (वय ४२, रा. कमलपुरा, मालेगाव, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आनंद बलभिम सरवदे (वय ३५, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी शनिवारी (दि. ३० मे) रोजी) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीचे टाटा कंपनीचे वाहन (एमएच १४ केक्यू ४५०३) हे आरोपीला करारनामा करून विकले होते.
या वाहनावरील श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते भरण्याची जबाबदारी आरोपी मुदस्सिर याने स्वीकारली होती. मात्र, काही हप्ते भरल्यानंतर उसने पुढील हप्ते भरणे बंद केले आणि हे वाहन परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात दिले. वारंवार सांगूनही आरोपीने वाहन नावावर हस्तांतरित करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, या वाहनावर नाशिक वन विभागाकडून अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. करार पाळण्याऐवजी आरोपीने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक दशवंत करीत आहेत.
