पिंपरी, दि. ३१ (pimpri chinchwad) – जुन्या भांडणाचा राग मनात धरून सख्ख्या चुलत्याने आपल्याच पुतण्यावर चाकूने हल्ला केला.
ही घटना शनिवारी (दि. ३० मे) रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आळंदी येथील अशोकनगर भागात घडली आहे.
बाळासाहेब दादू भोसले आणि सुरेखा बाळासाहेब भोसले (दोघे रा. अशोकनगर, आळंदी, ता. खेड, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नील सुरेश भोसले (वय ४२, रा. अशोकनगर, आळंदी, ता. खेड, जि. पुणे) यांनी शनिवारी (दि. ३० मे) रोजी आळंदी पालीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास फिर्यादीचे चुलते बाळासाहेब व सुरेखा यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या पत्नीला व फिर्यादीला रस्त्यात गाठून शिवीगाळ व दमदाटी केली.
वाद वाढल्याने आरोपी बाळासाहेब भोसले याने फिर्यादीवर हल्ला केला. त्याच्या हातातील चाकू फिरविल्याने फिर्यादी स्वप्नील यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
