कमी किमतीत गाडी देण्याच्या बहाण्याने साडेआठ लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – व्हॉट्सॲपवर गाड्यांचे फोटो पाठवून कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवत एकाची आठ लाख ५१ हजार ६०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना जुलै २०२४ ते जून २०२६ दरम्यान खराळवाडी येथे घडली.
रफीक अमिर मुल्ला (वय ५५, रा. महानतेशनगर, बेलगम, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. खराळवाडी, पिंपरी येथील एका नागरिकाने फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःचा गाडी विक्रीचा व्यवसाय असल्याचे खोटे सांगून फिर्यादीला मारुती सुझुकी इर्टीगा आणि महिंद्रा थार गाड्यांचे फोटो पाठवले. त्यांचा विश्वास संपादन करून पैसे घेतले, मात्र गाड्या किंवा रक्कम न देता फसवणूक केली. संत तुकाराम नगर पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *