दिघीत हमाल कामगाराला काठीने मारहाण

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – माल खाली करण्याच्या कारणावरून हमाल कामगाराला काठीने मारहाण केली. ही घटना २१ जून २०२६ रोजी सायंकाळी दिघी येथील दत्तनगर चौपाटीसमोरील भाजी मार्केटमध्ये घडली.
विनोद वाघमारे (वय ४०, रा. दत्तनगर, दिघी) असे आरोपीचे नाव आहे. युवराज नंदकिशोर वानखेडे (वय ३४, रा. कळस गावठाण, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माल खाली करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेले असता, “माझा माल सकाळी का लावला नाही” असे म्हणून आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादीने विरोध केला असता आरोपीने काठीने फिर्यादीच्‍या पाठीवर व मनगटावर मारून जखमी केले. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *