गॅस बिल अपडेट करण्याचा बहाण्याने २६ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) -एका ८४ वर्षीय नागरिकाला गॅस कनेक्शनचे बिल थकल्याचा मेसेज पाठवून, ॲप डाऊनलोड करायला लावले. त्यानंतर डेबिट कार्डच्या माहितीद्वारे २६ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १ ते २५ जून दरम्यान रहाटणी येथे घडली.
देवेश जोशी, अजय कुमार तुरी आणि अंकिता प्रमोद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केशव लक्ष्मण असनारे (वय ८४, रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एमएनजीएल गॅस बिल अपडेट करण्याचे सांगून व्हॉट्सॲपवर एक ॲप लिंक पाठवून डाऊनलोड करायला लावले आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती चोरून बँक खात्यातून पैसे लांबवले. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.