बँक खात्याचा गैरवापर करून एक कोटींची फसवणूक

​पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बँक खात्याचा गैरवापर करून देशातील दोन नागरिकांची तब्बल १ कोटी ५ लाख ६३ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना ४ जानेवारी ते ८ जुलै २०२६ दरम्यान देहूरोड परिसरातील थॉमस कॉलनी येथे घडली.
कुणाल हनुमंत सातपुते (वय २४, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) या आरोपीला अटक केली आहे. हवालदार हेमंत साधू खरात (वय ४०) यांनी सायबर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल याने त्याचे साथीदार आणि अभिजित विकास चव्हाण (वय २६, रा. देहूरोड) यांच्याशी संगणमत केले. अभिजितच्या ‘ABHIJIT WEB DEVELOPER’ या नावाने असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याचा वैयक्तिक कामासाठी ताबा मिळवला. या खात्यावर ५४ लाख ६२ हजार ५५३ रुपयांचे संशयास्पद व्यवहार करत देशातील दोन नागरिकांची एक कोटी ५ लाख ६३ हजार ५०० रुपयांची सायबर फसवणूक केली. पुढील तपास सायबर पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *