मुंबई : मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील कलानगर परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्सची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या बॅनर्सवर नितेश राणे यांचा ‘हिंदू गब्बर’ असा उल्लेख करण्यात आल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
खासदारांच्या फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना, मातोश्रीबाहेर लावण्यात आलेल्या या बॅनर्समुळे चर्चेला आणखी उधाण आले आहे. समर्थकांकडून करण्यात आलेली ही बॅनरबाजी राजकीय संदेश देणारी असल्याची चर्चा सुरू असून विविध स्तरांतून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, या बॅनर्सच्या माध्यमातून नितेश राणे यांच्या आक्रमक राजकीय शैलीचे समर्थन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने उभारण्यात आलेले हे फलक आणि त्यावरील मजकूर यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
