रस्ता दुभाजकामध्ये पत्त्यांचा जुगार; तिघांना नोटीस

पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – निगडी येथील स्पाईन रोडवर रस्त्याच्या दुभाजकातील मोकळ्या जागेत पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या तिघांवर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
​याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक गुणवंत पिसे यांनी शनिवारी (दि. ९ मे) रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश ग्यानुजी प्रधान (वय ३१, रा. ओटास्किम), उत्तम आण्णा दणाणे (वय ३५, रा. यमुनानगर) आणि बाळू शंकरराव घोलप (वय ६०, रा. ओटास्किम) यांच्यावर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिकन चौकाजवळ असलेल्या दुभाजकामध्ये हे आरोपी पैशावर पत्त्यांचा जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकून ५३० रुपये आणि साहित्य जप्त केले. सहाय्यक पोलीस फौजदार पांढरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *