बावधनमध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक; एक जण गंभीर जखमी

पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – विरुद्ध दिशेने आणि भरधाव वेगाने दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना बावधन येथील सर्व्हिस रोडवर २ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्‍या सुमारास घडली.
​या प्रकरणी कमलेश पुरुषोत्तम पाटील (वय ३५, रा. गंगा लिजंड काऊंटी, बावधन) यांनी शनिवारी (दि. ९ मे) रोजी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मैलारि शिवाजी हुलसोगि (वय ३१, रा. इस्कॉन कात्रज, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे रोजी सायंकाळी फिर्यादी आपल्या ॲक्टिव्हा गाडीवरून (MH 12 XW 9260) मित्राला सोडून घरी जात होते. चेलाराम हॉस्पिटलजवळ आले असता आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (MH 11 CR 4583) भरधाव वेगाने आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून चालवली. या धडकेत कमलेश पाटील गंभीर जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक गिरी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *