मुंबई | प्रतिनिधी
‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पावरून सुरू असलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “अरे, देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला शिव्यांची सवय आहे. शिव्याप्रूफ मी आहे,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, “जीवनात एकच शिकलो… आजपासून दहा वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाहीत, पण ती कनेक्टिंग लिंक तिथे असेल,” असे वक्तव्य करत विकासकामेच आपल्या कामाची खरी साक्ष देतील, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून, ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.
