Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

पर्यावरण दिनी दुर्गा देवी टेकडीवर हरित संकल्प; ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उद्या शुभारंभ

By Team News Beez
June 4, 2026 2 Min Read
0

वृक्षारोपण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना सहभागाचे आवाहन; हरित पिंपरी-चिंचवडकडे आणखी एक पाऊल

पिंपरी-चिंचवड :
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहराला अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ५) सकाळी सात वाजता शहराचे वैभव मानल्या जाणाऱ्या दुर्गा देवी टेकडी येथे वृक्षारोपण उपक्रमाने होणार आहे.

पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि उद्यान विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘हरित पिंपरी-चिंचवड, स्वच्छ पिंपरी-चिंचवड’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अभियानांतर्गत वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, जनजागृती उपक्रम आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध कृती राबविण्यात येणार आहेत. शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, विद्यार्थी आणि विविध घटकांचा सहभाग वाढवून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. वृक्षारोपण, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार केल्यास शहर अधिक सुंदर आणि शाश्वत बनू शकते, असे त्यांनी नमूद केले.

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती आणि जनजागृती या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दुर्गा देवी टेकडी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहराच्या हरितीकरण मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहन मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुरू होणारे ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियान हे केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नसून पर्यावरण संरक्षणाची व्यापक जनचळवळ उभारण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभाग नोंदवून हरित आणि स्वच्छ पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

ही घरकोंबड्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची निवडणूक, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

Next

अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

CATEGORIES

  • Uncategorized (440)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 24, 2026

Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

Sumedh Chapalgaonkar

पवनानगर, दि. २४-*पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *धरण ९५...

Read More
July 24, 2026
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme