Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राजकीय

ही घरकोंबड्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची निवडणूक, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

By Team News Beez
June 4, 2026 2 Min Read
0

विधान परिषदेची निवडणूक कार्यकर्त्यांची राहिलेली नाही, असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी हे लक्षात घ्यावे की उबाठा गटाकडे कार्यकर्तेच शिल्लक राहिले नसतील तर ती कार्यकर्त्यांची निवडणूक कशी राहील? महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्यावेळी तुम्ही घरात बसला होतात. तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. कोणतीही निवडणूक कार्यकर्त्यांच्या जीवावर लढता येते आणि जिंकता येते. भाजपा-महायुतीने कार्यकर्त्यांना मोठे केले, त्यांना संधी दिली. त्यामुळे ही घरकोंबड्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संकटमोचक काय करणार आहेत, हे विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊतांना समजेल. संपलेल्या पक्षाला ना संकटाची भीती असते, ना संकटमोचकाची. उबाठा गट पूर्ण अस्तित्वहीन झालेला असल्याने त्यांना ना संकटाची भीती आहे, ना संकटमोचकाची. तुमची मशाल कुठेकुठे विझली आहे ते पहा. आपल्या उबाठाची कचराकुंडी झालेली आहे, त्याकडे राऊतांनी पहावे. महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर सर्वात जास्त उद्योगपतींना तिकीट देण्याचे काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केले. विधान परिषदेची आणि राज्यसभेची यादी वाचून दाखवली तर तुम्ही कुठल्याकुठल्या उद्योगपतींना कसे कसे तिकीट दिले होते, हे महाराष्ट्राने पाहिले असल्याचे श्री. बन यांनी सुनावले.

श्री. बन पुढे म्हणाले, 2029 ची लोकसभा निवडणुकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि ते पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. पुढच्या दीड वर्षांत संजय राऊत हे उबाठा गट सोडून राज्यसभेसाठी राहुल गांधींच्या पाया पडून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील. उद्धव आणि आदित्य ठाकरे हे संजय राऊतांना राज्यसभेची संधी देणार नसल्याने संजय राऊत यांच्यासमोर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

बारामतीत सुरु असलेले युगेंद्र पवार यांचे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही तर हा युगेंद्र पवार विरुद्ध रोहित पवार असा हा सामना आहे. दोन-चार दिवसांपासून रोहित पवार महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. मग रोहित पवारांचा गट पुढे चालला आहे म्हणून आज युगेंद्र पवार आपली वेगळी चूल मांडत आंदोलनाचा प्रयत्न करत आहेत. हा लढा महागाईच्या विरोधात नाही, तर शरद पवार यांचे वारसदार रोहित पवार आहेत की युगेंद्र पवार यासाठी सुरू आहे, असे श्री. बन म्हणाले.

ममता बॅनर्जींचा पक्ष भाजपाने फोडला नाही तर ममता बॅनर्जीं, अभिजीत बॅनर्जींची दादागिरी झुगारून तिथल्या आमदारांनी स्वतःला स्वतंत्र करून घेतले असल्याचे सांगून श्री. बन म्हणाले, आता पश्चिम बंगाल दहशतमुक्त राज्य झाले आहे. या आमदारांनी त्यांचा स्वतंत्र गट केलेला आहे. आता ना ममतादीदींची दहशत राहिली, ना त्यांच्या भाच्याची. ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला, त्यांच्या अहंकाराचा गड हा पश्चिम बंगालच्या जनतेने उध्वस्त केला आहे. त्यामुळे आजपर्यंत दहशतीत राहणाऱ्या आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे आणि ते स्वतंत्रपणे आपले धोरण आणि विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

आषाढी वारीच्या तयारीचा आढावा; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची पालखी मार्गावर पाहणी

Next

पर्यावरण दिनी दुर्गा देवी टेकडीवर हरित संकल्प; ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उद्या शुभारंभ

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme