Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पुणे

हडपसर विषारी दारू प्रकरण : तीन पोलिस अधिकारी निलंबित; १२ जणांच्या मृत्यूनंतर कारवाई

By Team News Beez
May 29, 2026 1 Min Read
0

पुणे : हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणात १२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे शहर पोलिस दलात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर चौकीच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी अथवा विषारी दारू सेवन केल्याने १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध दारू विक्रीच्या साखळीचा तपास सुरू आहे.

निलंबनाच्या आदेशात संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. अवैध दारू विक्रीबाबत माहिती उपलब्ध असतानाही प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अपयश आल्याने ही घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकारामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचेही आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्यासाठी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित ठेवण्यात येणार आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पोलीस आयुक्तालयात राहणार असून नियमानुसार त्यांना निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

या कारवाईनंतर हडपसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार पोलीस निरीक्षक अशोक इप्पर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. विषारी दारू प्रकरणानंतर पोलिस प्रशासनाने जबाबदारी निश्चित करण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.

Tags:

Pune City Police
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

थेरगाव येथे ३.३० लाखांचा गांजा पकडला

Next

जगणे तर सोडा, येथे मरणही यातनादायी स्मशानभूमीचा रस्ता बंद असल्याने पत्र्यावरून मृतदेह नेण्याची शोकांतिका

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
  • Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
  • Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
  • ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
  • लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश

CATEGORIES

  • Uncategorized (457)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (879)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
  • Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
  • Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
July 25, 2026

Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या युवा पिढीच्या बदलत्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी यांच्या पुनर्विकासानंतरही आखाड्याची ऐतिहासिक परंपरा आणि क्रीडा उपक्रम...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना

Sumedh Chapalgaonkar

पुणे : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme