सिक्कीममध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात भीषण दुर्घटना; मिथेन गॅस स्फोटानंतर दरड कोसळली, 7 कामगारांचा मृत्यू, 27 अडकले
सिक्कीममधील नामची जिल्ह्यात निर्माणाधीन ‘तिस्ता स्टेज-6’ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात भीषण दुर्घटना घडली आहे. बोगद्यात मिथेन गॅसचा स्फोट झाल्यानंतर अचानक दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 7 कामगारांचा मृत्यू झाला असून 27 कामगार बोगद्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, दुर्घटनेचे नेमके कारण आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.