Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

तक्रारींकडे वेळीच लक्ष दिले असते तर निष्पाप जीव वाचले असते – डॉ. नीलम गोऱ्हें

By Team News Beez
May 31, 2026 2 Min Read
0

अवैध दारूच्या साखळीचा छडा लावण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड :
फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात झालेल्या मृत्यूंसाठी केवळ आरोपीच नव्हे, तर तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी यंत्रणाही तितकीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. रविवारी त्यांनी फुगेवाडीतील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

“स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी सातत्याने अवैध दारूविक्रीबाबत इशारा देत होते. मात्र त्या तक्रारींना गांभीर्याने घेतले गेले नाही. वेळेत कारवाई झाली असती तर अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला नसता,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

त्यांनी सांगितले की, फुगेवाडी-दापोडी परिसरातील अवैध दारूविक्रीबाबत शिवसेनेचे निलेश हाके यांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. खासदार श्रीरंग बारणे यांनीही हा मुद्दा सातत्याने मांडला होता. तरीही संबंधित यंत्रणा प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आज अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

विषारी दारूचा प्रश्न हा केवळ पिंपरी-चिंचवडपुरता मर्यादित नसल्याचेही त्यांनी नमूद केले. देशभरात अशा घटना घडत आहेत. विषारी दारूमध्ये वापरले जाणारे मिथेनॉलसारखे घातक रसायन नेमके कोणाकडून आणि कसे उपलब्ध होते, याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण पुरवठा साखळीवर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीसांनी सातत्याने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नागरिकांकडून अनेकदा अवैध धंद्यांविरोधात तक्रारी दिल्या जातात. मात्र त्यांची दखल घेतली जात नाही. परिणामी अशा दुर्घटना घडतात, असेही त्या म्हणाल्या. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पीडित कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही डॉ. गोऱ्हे यांनी दिले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. फुगेवाडीतील मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून या प्रकरणामुळे अवैध दारूविरोधातील यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Tags:

Dr. Neelam Gorhe
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

हिंगोलीत 3.5 रिश्टर भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीती

Next

विषारी दारू प्रकरणाची मुळापर्यंत चौकशी करा; पीडितांच्या वारसांना नोकरी द्या : रामदास आठवले

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
  • Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’
  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
  • Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
  • Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य

CATEGORIES

  • Uncategorized (459)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (879)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
  • Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’
  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
July 25, 2026

Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू

Sumedh Chapalgaonkar

जेरुसलेम : पॅलेस्टिनी बहुल वेस्ट बँकमधील नाब्लूसजवळील ताल गावात इस्रायली सैनिक, ज्यू वसाहतवादी (सेटलर्स) आणि...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या युवा पिढीच्या बदलत्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme