पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – दापोडी परिसरात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला १६ हजार १९५ रुपयांचा दारूसाठा अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १ मे) रोजी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार निखील बाळासाहेब वर्षे (वय ३४) यांनी शनिवारी (दि. २ मे) रोजी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किरण काशीनाथ सूर्यवंशी (वय ३२, रा. घर क्र. १४५, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, दापोडी, पुणे) या सफाई कामगारावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे २०२६ रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास महात्मा फुलेनगर झोपडपट्टीतील घर क्र. १४५ च्या शेजारी असलेल्या एका बंद शटरसमोरील मोकळ्या जागेत आरोपीने विनापरवाना दारू विक्रीसाठी ठेवली होती. या छाप्यात पोलिसांनी १६ हजार १९५ रुपये किमतीचा प्रोव्हिबिशनचा माल जप्त केला. या प्रकरणाचा अधिक तपास दापोडी पोलीस ठाण्याचे पोहवा पाटील करत आहेत.
दापोडीत बेकायदेशीर दारूसाठा जप्त
