दर तीन वर्षांनी येणाऱ्या तसेच हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या अधिक महिन्याचे ह्या वर्षीच्या ज्येष्ठ महिन्यात आगमन होत आहे, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या, अधिक महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते,त्याचेच औचित्य साधून तळेगाव दाभाडे येथील सद्गुरू सेवा मंडळ यांच्या वतीने “श्री स्वामी समर्थ” या मंत्राचा सव्वा कोटी जप करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे, रविवार दिनांक १७ मे ते गुरुवार दिनांक ११ जून या कालावधीत ह्या सोहळ्यात सहभागी होण्याचे व हा नामजप पूर्ण करण्याचे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परेश दत्तात्रय कुलकर्णी यांनी केले आहे.
ह्या उपक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या जपासाठी कोणतीही बंधने नसून जप हा भाविकांना आपल्या घरी, तसेच कामाच्या ठिकाणीही करता येणार आहे, फक्त केलेल्या जपाची नोंद ही आपल्या पत्रिकेत करणे आवश्यक आहे असेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच या काळात दररोज सायंकाळी भजन महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे त्याचाही लाभ भक्तांनी घ्यावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे,
तर ह्या महासंकल्पाची सांगता ११ जून रोजी श्री.गणेश खांडगे ह्यांच्या निवासस्थानी होणार असून त्या साठी करवीर पिठाचे जगद्गुरू शंकराचार्य, गुरुवर्य मोहनबुवा रामदासी तसेच अयोध्या राममंदिर कोषाध्यक्ष श्री गोविंदगिरी देव महाराज उपस्थित राहणार आहेत. या मंगल प्रसंगी दिवसभर उपस्थित राहून प्रवचन आणि महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने श्री गणेश खांडगे ह्यांनी केले आहे .
सद्गुरू सेवा मंडळ तळेगाव दाभाडे ह्यांच्या वतीने अधिकमासनिमित्त “श्री स्वामी समर्थ” मंत्राच्या सव्वा कोटी जपाचा संकल्प
