फिफा विश्वचषक ट्रॉफीबाबत रंजक माहिती; १८ कॅरेट सोन्यापासून बनलेली, वजन तब्बल ६.१४२ किलो

फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफीबाबत काही रंजक माहिती समोर आली आहे. फिफाच्या माहितीनुसार, विश्वचषक ट्रॉफीचे एकूण वजन ६.१४२ किलोग्राम असून ती १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. फुटबॉल विश्वातील सर्वात प्रतिष्ठेचे मानले जाणारे हे विजेतेपदाचे प्रतीक प्रथम १९७४ च्या फिफा विश्वचषकापासून विजेत्या संघाला प्रदान केले जात आहे.

प्रत्येक नवीन विश्वविजेता संघानंतर ट्रॉफीच्या तळाशी असलेली विजेत्या संघाची नोंद असलेली डिस्क बदलली जाते. काढून ठेवलेली ही डिस्क फिफा संग्रहालयात कायमस्वरूपी जतन केली जाते, तर मूळ ट्रॉफी पुढील विजेत्या संघासाठी राखून ठेवली जाते.

फिफाने ट्रॉफीच्या सुरक्षेसाठी अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. मूळ विश्वचषक ट्रॉफीला हातमोजे न घालता स्पर्श करण्याचा अधिकार केवळ फिफाचे अध्यक्ष, संबंधित देशाचे राष्ट्रप्रमुख आणि विश्वविजेता संघातील खेळाडूंनाच आहे. इतर सर्व व्यक्तींना ट्रॉफी हाताळताना विशेष नियमांचे पालन करावे लागते.

फुटबॉल चाहत्यांसाठी ही ट्रॉफी केवळ विजेतेपदाचे प्रतीक नसून, जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा सन्मानांपैकी एक मानली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *