मुंबई हुन पुण्याला जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसच्या इंजिनात आज सकाळी दहा वाजता शेलू ते नेरळ दरम्यान अचानक बिघाड होऊन एक्सप्रेस गाडी रस्त्यातच बंद पडल्याने सुमारे पाऊण तास मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे वाहतुकीचा खोळंबा झाला, ऐन गर्दीच्या काळात सकाळी दहा वाजता एक्सप्रेस बंद पडल्याने त्याचा सर्वाधिक फटका कर्जत खोपोली दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांना बसल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला, तर इतर लांब पल्ल्याच्या गाड्याही विविध स्थानकांवर थांबवून ठेवल्यामुळे उशिराने धावत होत्या, घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या तांत्रिक विभागाने घटना स्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर प्रयत्न करत इंजिनातील बिघाड दुरुस्त केला, त्यानंतर सदर डेक्कन एक्सप्रेस पुण्याकडे रवाना झाली आणि विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तासानंतर पूर्वपदावर आली.
मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस च्या इंजिनात बिघाड, ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल
