बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अनशुला कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आपल्या रॉयल आणि एलिगंट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक कांजीवरम सिल्क साडीला मॉडर्न टच देत तिने ब्रालेट स्टाईल ब्लाऊजची आकर्षक जोड दिली. सोनेरी झाक असलेल्या या लूकमध्ये जान्हवीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसले.
पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा सुंदर मिलाफ साधणाऱ्या या स्टाईलची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली असून, चाहत्यांकडून तिच्या या लूकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
