Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

अवैध दारूविरोधात तिन्ही यंत्रणांचा संयुक्त एल्गार; पुणे-पिंपरी परिसरात मोठ्या कारवाईची तयारी

By Team News Beez
June 6, 2026 2 Min Read
0

पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस एकाच व्यासपीठावर; हातभट्ट्या, भेसळयुक्त दारू आणि तस्करी रोखण्यासाठी समन्वित मोहीम

पिंपरी–चिंचवड :
फुगेवाडी विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू व्यवसायाविरोधात आता व्यापक आणि समन्वित मोहीम उभारण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील अवैध दारूच्या संपूर्ण साखळीवर एकाचवेळी कारवाई करण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्त रणनीती आखली आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उच्चस्तरीय समन्वय बैठक पार पडली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (५ जून) आयोजित बैठकीत अवैध दारू निर्मिती, वाहतूक, साठवण आणि विक्री रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः सीमाभागातून होणारी दारूची तस्करी, हातभट्ट्यांचे जाळे आणि भेसळयुक्त मद्यनिर्मितीवर संयुक्त कारवाई करण्यावर भर देण्यात आला.

बैठकीला पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त गिरीष हुकरे, पुणे शहर पोलीस उप आयुक्त चिलूमुल्ला रजनीकांत तसेच पिंपरी-चिंचवडचे पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अवैध दारूच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हातभट्ट्यांपासून ते अंतिम विक्रेत्यांपर्यंत संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी विभागांमध्ये गुप्त माहितीची देवाणघेवाण अधिक प्रभावी करण्याचे ठरले. संशयास्पद हालचाली, अवैध साठे आणि तस्करीच्या मार्गांबाबत तात्काळ माहितीची देवाणघेवाण करून कारवाई केली जाणार आहे.

येत्या काळात पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकांकडून विविध भागांत धडक मोहिमा राबविण्यात येणार आहेत. विशेषतः पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण भागांच्या सीमांवरील संवेदनशील ठिकाणे रडारवर ठेवली जाणार आहेत.

फुगेवाडीतील दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने अवैध दारूविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण स्वीकारल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. त्यामुळे हातभट्टी चालक, भेसळयुक्त दारू तयार करणारे, तस्कर आणि अवैध विक्रेते यांच्याविरोधातील कारवाया अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत. अवैध दारूच्या संपूर्ण साखळीवर एकत्रितपणे घाव घालण्यासाठी उभारलेली ही मोहीम आगामी काळात निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

हातात बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन अभिजीत दिपके दिल्लीत दाखल; जंतर-मंतरवर उपस्थितीमुळे चर्चांना उधाण

Next

काळ्या बाजारातील अवैध गॅस साठा जप्त; एक जण ताब्यात!

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
  • शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
  • पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण
  • NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’
  • धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश

CATEGORIES

  • Uncategorized (462)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (883)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
  • शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
  • पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण
July 25, 2026

पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) : महाळुंगे इंगळे येथील घरफोडी करून चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्र बाळगल्या प्रकरणी रावेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली....

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर घाटावर बसलेल्या एका व्यक्तीला तिथेच...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांकडून...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील मोठी कारवाई...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme