काळ्या बाजारातील अवैध गॅस साठा जप्त; एक जण ताब्यात!

​पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – चोरून व चढ्या भावाने विक्री करण्यासाठी २३ गॅस सिलिंडरची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. ४ जून) रोजी सायंकाळी ७:४५ वाजता चाकण-आगरकरवाडी रोडवरील सिद्धार्थ बौद्ध विहारासमोर करण्यात आली.
विवेक लालमन गुप्ता (वय ४५, रा. आगरकरवाडी, चाकण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई शिवाजी दत्तात्रय लोखंडे यांनी शुक्रवारी (दि. ५ जून) रोजी चाकण उत्तर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विवेक गुप्ता हा त्याच्या पिवळ्या रंगाच्या पॅगो गाडीतून (क्र. MH 14 FT 1067) ६९ हजार रुपये किमतीच्या २३ भरलेल्या गॅस टाक्या अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जात होता. पोलिसांनी गाडीसह एकूण एक लाख ६९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. ​या घटनेचा पुढील तपास चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दगडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *