Nanded-नांदेडमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांवर FDA आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; मोठा साठा जप्त

नांदेड शहरात पाकिस्तानी बनावटीची सौंदर्यप्रसाधने विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि नांदेड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला आहे.

ही कारवाई शहरातील मन्यार गल्ली परिसरात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या धाडीत संशयित दुकानातून विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांची कायदेशीरता, आयात प्रक्रिया आणि विक्रीसंदर्भातील कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळयुक्त आणि बेकायदेशीर उत्पादनांविरोधात कारवाईचा धडाका सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *