तळेगावमध्‍ये गांजा बाळगणाऱ्याला अटक

पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – तळेगाव चाकण रोडवरील ऐश्वर्या हॉटेलच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत गांजा विक्रीसाठी आलेल्‍या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवार (दि. २४ एप्रिल) रोजी रात्री सव्‍वानऊ वाजण्याच्या सुमारास करण्‍यात आली.
पोलीस अंमलदार आनंद मोहिते यांनी शनिवारी (दि. २५ एप्रिल) रोजी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार विशाल रोहिदास पडवळ (वय ३०, रा. खडोबामाळ, चाकण, पुणे) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करून पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऐश्वर्या हॉटेलच्या मागे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोदामाजवळ आरोपी विशाल पडवळ हा गांजा विकण्यासाठी उभा होता. पोलिसांनी त्‍याला सापळा लावून अटक केली. त्याच्याकडून ४४ हजार रुपये किमतीचा ८५६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *