पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – विश्वासू नोकराने मालकाची फसवणूक करून ग्राहकांकडून गोळा केलेली १ लाख १५ हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. हा प्रकार काळेवाडी परिसरात २५ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान घडला.
याप्रकरणी विकास विनोद रमनानी (वय ३०, रा. काळेवाडी) यांनी सोमवारी (दि. २७ एप्रिल) रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी युनूस खान (वय ३०, रा. नढेनगर, काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने युनूस याला विश्वासाने वसुलीसाठी पाठवले होते. आरोपीने ताथवडे येथील ‘ए टू झेड फुटवेअर्स’कडून ४५ हजार आणि धायरी येथील शाखेतून ७० हजार अशी एकूण १ लाख १५ हजार रुपयांची रोकड फिर्यादीला न देता लबाडीच्या हेतूने स्वतःकडे ठेवून पळ काढला. काळेवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कोरडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ग्राहकाकडून जमा केलेल्या १.१५ लाखांचा अपहार
