बँक खात्याद्वारे डॉक्‍टरने केली १० नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक

​पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – एका डॉक्टरने बँक खाते उघडून साथीदारांसह देशातील १० नागरिकांची ९ लाख २३ हजार रुपयांची सायबर फसवणूक केली. ही घटना २२ ऑक्‍टोबर २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत थेरगाव येथे घडली.
सागर सचदेव मेश्राम (वय ३५, रा. थेरगाव, पुणे) व त्‍याचे साथीदार अशी गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार आर.बी. गोडांबे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आरबीएल बँकेत खाते उघडून साथीदारांच्या संगणमताने एक ग्रुप तयार केला व त्याद्वारे देशातील १० नागरिकांची ९ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *