पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – सोसायटीची सभा सुरू असताना जुन्या तक्रारीचा राग मनात धरून एका सभासदावर शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. १६ मे) रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास चऱ्होली येथील तनिष पार्क सोसायटीमध्ये घडली.
या प्रकरणात बाळासाहेब पोपटराव झोडगे (वय ५८, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी रविवारी (दि. १७ मे) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बाबूराव साने (वय ४२, रा. तनिष पार्क, चऱ्होली) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झोडगे राहत असलेल्या सोसायटीची विशेष सभा शनिवारी रात्री सुरु होती. त्यावेळी आरोपीने मागील तक्रारींच्या कारणावरून झोडगे यांच्या डोक्यात व पाठीवर शस्त्राने वार केले. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
सोसायटीच्या सभेत तक्रारीच्या कारणावरून सभासदावर हल्ला
