डिलिव्हरी फ्रेंचायझीच्या बहाण्याने सव्‍वापाच लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – एका व्यक्तीला इन्स्टाग्रामवरील जाहिरातीद्वारे डिलिव्हरी फ्रेंचायझी देण्याचे आमिष दाखवून ५ लाख २२ हजार ८३७ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. २१ मे ते २२ जून दरम्यान डुडुळगाव येथे घडला.
सौरभ कुमार, प्रियांका सिंग आणि संबंधित बँक खातेधारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतुल नामदेव वहिले (वय ३८, रा. व्हिजन रिदम सोसायटी, डुडुळगाव) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला ‘DELHIVERY FRANCHISE’ ची खोटी कागदपत्रे ईमेलवर पाठवून विश्वास संपादन केला व मोठा फायदा करून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण पाच लाख २२ हजार ८३७ रुपये भरण्यास प्रवृत्त करून फसवणूक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास दिघी पोलीस ठाणे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *