पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – कौटुंबिक जमिनीच्या वादातून चुलत नातवाने आपल्या ४ साथीदारांसह आजोबांच्या घरावर गोळीबार करीत वाहनांची तोडफोड केली. ही घटना २६ जून रोजी खेड तालुक्यातील मोई येथे घडली.
आशिष गवारी (वय २१, रा. चिंचवड) आणि त्याच्या ४ अनोळखी साथीदारांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सुरेश विष्णू गवारी (वय ६०, रा. मोई, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोरील दोन चारचाकी वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली, तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार करून दहशत माजवली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
जमिनीच्या वादातून चुलत नातवाचा पिस्तुलातून गोळीबार; गाड्यांची तोडफोड
